⁠ 
बुधवार, मे 8, 2024

लॉकडाऊनमुळे पिंग्मी एजंटावर उपासमारीची वेळ, शासनाने एजंटाना मदती करावी ; रविशंकर पांडेंची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । गेल्या मार्च २०२० पासून ते आज पर्यंत कोरोना आजाराच्या महामारीमुळे कमी होत नसल्याने लॉकडाऊन कायम आहे. देशातील व राज्यातील जनतेच्या हितासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला असला तरी लहान सहान व्यवसायकाना बचतीचे धडे देणाऱ्या विविध सहकारी बँक व पतसंस्था मध्ये दैनिक ठेव जमा करणाऱ्या पिग्मी एजंटावर मात्र यानिर्णयाचा मोठा फटका बसला आहे.

दैनिक ठेवी बंद झाल्याने केवळ यावर अवलंबून असलेल्या पाचोरा तालुक्यातील पिग्मी एजंटावरती उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे पाचोरा शहरी व ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यवसायकिनासाठी बँक सह पतसंस्था बचती साठी मोलाचे ठरले आहे. या संस्था मधून घेतलेल्या कर्जातून अनेकांना रोजगाराची संधी देखल उपलब्ध झाले आहे त्या मुळे अशा संस्था मध्ये दैनिक ठेव च्या स्वरुपात पैसे ठेवनराची संख्या मोठी आहे. काही सहकारी बँकन सह पतसंस्था मध्ये अशा व्यवसायीकान कडून  बचत ठेव जमा करण्याचे काम पिंग्मी एजंट करतात अशा पिग्मी एजंटाची पाचोरा तालुक्यात संख्या बरीच आहे.

सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने यापिग्मी एजंटा कडून रोज केले जाणारे कलेक्शनच बंद झाले त्याचा फटका व्यवसायीक प्रमाणे त्यांच्या कडून दरोरोज पैसे जमा करणाऱ्या पिग्मी एजंटानाही बसला आहे. सध्या कलेक्शनच होत नसल्याने रोजच्या उदरनिर्वाहच्या दृष्टीने शासनाने इतर व्यवसायीकाना व मंजूराना शासना कडून मदतीचा हात दिला आहे. त्याच प्रमाणे असंघटित कामगार व इतर मंजुरान प्रमाणे पिंग्मी एजंटाचा त्या योजेनेत समवेश करून शासना कडून मदत मिळावी असे आशेचे मागणी रविशंकर पांडे  पिग्मी एजंट यांनी केली असून मुख्यमंत्री उद्वजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवा , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन पाठविले. तसेच आमदार किशोरअप्पा पाटील,  प्रांतधिकारी सो पाचोरा, तहसीलदार पाचोरा, साह्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा यांना रविशंकर पांडे, विलास भागवत पाटील श्रीकृष्ण दलाल , घनश्याम दायमा रवींद्र वाणी ,यांनी निवेदन देऊन पिग्मी एजंटाच्या व्यथा सांगितल्या आहे.