जळगाव जिल्हामहाराष्ट्र

मनपाचा प्रताप ! गटारींचे १० कोटी एका महिन्यांत…..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । जळगाव शहरात गटारींच्या बांधकामासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेकडून वर्षभरात १० कोटी रुपयांच्या गटारींचे काम करण्यात येणार होते.

परंतु सदर तरतुदीमधील सर्व निधीचा एका महिन्यात विनियोग करण्यात आल्यामुळे मनपा प्रशासनाने जळगाकरांना एक प्रकारे धक्काच दिला आहे. मनपाचा बांधकाम विभागाने एका महिन्यात सर्व १० कोटी रुपयांच्या कामांचे इस्टिमेट तयार करून निधीचा विनियोग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महानगरपालिकेच्या अर्थ संकल्पात वर्षभरासाठी खर्च होणाऱ्या निधीची तरतुद केली जाते. शहरातील गटारींच्या बांधकामासाठी मनपा प्रशासनाने ३ कोटी रुपयांची तरतुद केली होती. परंतु ही तरतुद कमी असल्यामुळे भाजप नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी ३ कोटी ऐवजी १० कोटी इतकी करावी, अशी सूचना अर्थसंकल्पाच्या सभेत केली होती. त्यानंतर सुधारीत अर्थ संकल्पात प्रशासनाने १० कोटी इतकी तरतुद केली होती.

हा सुधारीत अर्थ संकल्प नगरसेवकांच्या हाती येत नाही तोपर्यंत सदर निधी खर्चांसाठी इस्टिमेट तयार झाले असून अनेक कामे देखील सुरु झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील ११ महिन्यात गटारींचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध कसा होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील रस्त्यांवर १० कोटी खर्चाची तरतुद मनपाच्या अर्थ संकल्पात करण्यात आली होती. परंतु ही तरतुद कमी असल्यामुळे नगरसेवकांनी १० कोटी ऐवजी २८ कोटी इतकी करावी, अशी सूचना अर्थसंकल्पाच्या सभेत केली होती.

त्यानंतर सुधारीत अर्थ संकल्पात प्रशासनाने २८ कोटी इतकी तरतुद केली होती. या तरतुदीतून एकाच महिन्यात २१ कोटींच्या कामांचे ईस्टीमेंट तयार झाले असून कामे मार्गी लागले आहेत. या निधीतून कोणकोणत्या रस्त्यांची कामे घेण्यात आली किती रस्ते प्रस्तावित आहेत. याबाबत बहुतांश नगरसेवक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

Related Articles

Back to top button