⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

प्रत्येक माणसाचं वैभव आपल्या कामातून वाढवणारं असावं : मंत्री धनंजय मुंडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात आमदार कार्यालय पाहिले आहे. पण अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी आमदाराऐवजी पक्षाचे कार्यालय उभारून तळागाळातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका व वसा घेतलेला आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पक्षाचं कार्यालय हे त्या लोकप्रतिनिधीचं वैभव वाढवणारं नसावं. तर ते पक्ष वाढवणारं असावं, येणार्‍या प्रत्येक माणसाचं वैभव आपल्या कामातून वाढवणारं पाहिजे. त्याच धर्तीवर या पक्ष कार्यालयात आल्यावर आपले काम पटकन होते. असा जनसामान्यांमध्ये विश्‍वास या वास्तुतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्माण झाला पाहिजे. असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मुंडे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत धनशक्ति विरूद्ध जनशक्ति अशी स्थिती असताना अमळनेरकर जनतेने धनास न बळी पडता राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिल्याबद्दल नतमस्तक होत आभारही त्यांनी मानले. यावेळी आपल्या मनोगतात आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीत ‘धनशक्ति विरूद्ध जनशक्ति’ अश्या लढतीत जनशक्तिचा विजय जनतेने केला. आज आमदार आहोत उद्या काय होऊ हे माहिती नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी पाट्या बदलविण्यापेक्षा तहयात पक्षाचं कार्यालय राहील, त्यात सर्वात महत्वाच म्हणजे पक्षाचं कार्यालय स्थापन केल्यामुळे जनसामान्यांना कायमच येथून न्याय मिळेल. आपल्या मतदारसंघात एकदा आमदार झाले व पडले तरी त्यांचे आमदार कार्यालय मात्र कायम आहे. त्यामुळे आमदार कार्यालयाऐवजी पक्ष कार्यालह ही संकल्पना, भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जागृत करत आमदार कार्यालयाऐवजी पक्षाचे कार्यालय निर्माण केलं. यानिर्मितीमागे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे दोन वर्षांपासून अथक परिश्रम असल्याने त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी पारोळ्याचे माजी आमदार सतीश पाटील, जळगाव चे माजी आमदार गुलाबराव देवकर, चोपडा चे माजी आमदार कैलास पाटील , पाचोरा माजी आमदार दिलीप वाघ, माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे, जामनेरचे संजय गरुड, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी प्रवक्ता योगेश देसले, ओबीसी जिल्हाप्रमुख उमेश नेमाडे, मुक्ताईनगरचे रवींद्रभैय्या पाटील, अमळनेर चे माजी आमदार साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस हाजी एजाज मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, रिटा बाविस्कर, अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासक तिलोत्तमा पाटील, अरविंद मानकरी, अमळनेर पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, अमळनेर नगर परिषदेचे नगरसेवक राजेश पाटील, विवेक पाटील , रामकृष्ण पाटील, गायत्री पाटील, यज्ञेश्वर पाटील, विजू लांबोळे, नरेंद्र संदांशिव, श्याम पाटील व अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष युवक काँग्रेस अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.