⁠ 
शनिवार, मे 4, 2024

टेन्शन वाढलं : ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा भारतात शिरकाव, येथे आढळला पहिला रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । गेली अडीच वर्ष झाली तरी जगावरील कोरोना व्हायरसचं संकट अद्यापही दूर झालेलं नाहीय. त्यात नवनवीन व्हायरस आढळून येत असल्याने जगाचं टेन्शन पुन्हा वाढत आहे. दरम्यान, अशातच कोरोना संख्या नियंत्रणात येत आसताना आता भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या रुग्णामध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार बीए.४ व्हेरियंट सापडल्याचं समोर आलं आहे.

Omicron चे BA.4 व्हेरियंट चा प्रकार प्रथम या वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडले होते. त्यानंतर तो हळूहळू इतर देशांमध्ये पसरला. डझनहून अधिक देशांना वेठीस धरणारा BA.4 भारतात नव्हता. मात्र आता हा व्हेरियंट समोर आल्यानंतर भारताचे टेन्शन वाढले आहे. हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा उपप्रकार बीए.४ असून हैदराबादमध्ये पहिला रुग्ण सापडला आहे.

अफ्रिकेहून आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉनच्या बीए.४ व्हेरियंट सापडला आहे. हैदराबाद विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ मे रोजी या रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, रुग्णामध्ये कोणतेही लक्षण दिसून आले नव्हते. दरम्यान, हा प्रवासी १६ मेला पुन्हा अफ्रिकेला गेला. मात्र, या कालावधीत तो शहरात फिरत असल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.