यावल

यावल तालुका समन्वय समितीची पहिली बैठक उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । यावल तालुका समन्वय समितीची पहिली बैठक येथील तहसील कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी व समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे होते.

यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत उपस्थित अधिकाऱ्यांना शासकीय योजनांची तातडीने अमलबजावणी करणे बाबतच्या सुचना दिल्या. पाणी पुरवठा व सिंचनाचा प्रश्न असो गावपातळीवरील विविध जातीच्या शासकीय निधीच्या माध्यमातुन विकास करणे. तसेच तालुक्यातील येणाऱ्या समस्या बाबत आमदारांनी सविस्तर आढावा घेत मागील दोन वर्षातील कोरोना संसर्गाच्या काळात शासनाच्या विकास कामांचा वेग हा मंदावला होता. मात्र, पुढील अडीच वर्ष आपल्याला विकास कामांचा अनुशेष हा वेगाने भरून काढावा लागणार असुन याकरीता आपण सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन आमदारांनी केले.

या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, समिती सदस्य प्रा. मुकेश येवले, लीलाधर चौधरी, रविन्द्र सोनवणे, नितिन चौधरी, सदस्या जयश्री पाटील, ललीता चौधरी, प्रेरणा भंगाळे, तहसीलदार महेश पवार, आयपीएस अधिकारी आशित कांबळे, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर नगर परिषदचे अभियंता योगेश मदने, वन विभागाचे विक्रम पदमोर, वनजिव्य विभागाचे सहा. वनसंरक्षकअश्विनी खोपडे, हतनुर पाटबांधारे एन.पी.महाजन, फैजपुर नगर परिषदचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, पं.स.चे सहाय्यक गटविकास अधिकारी के सी सपकाळे, कृषी विभागाचे एस.बी.सिनारे, ग्रामीण पाणीपुरवठा पी.बी. देसले आदी विभागाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. आभार निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांनी मानले.

Related Articles

Back to top button