कृषीजळगाव जिल्हामहाराष्ट्र
शेतकऱ्याने वाजत गाजत केली कापसाची लागवड ; जिल्ह्यात झाला चर्चेचा विषय
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. यामुळे यावर्षी कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी होईल, असे भाकीत म्हटले जात होते. मात्र एका शेतकऱ्याने शेतात वाजंत्री नेऊन वाजत गाजत केलेली कापसाची लागवड केली आहे.
जळगाव तालुक्यातील दुसखेडा येथील नितीन महाजन यांनी यावर्षी देखील कापूस लागवडीचा निर्णय घेऊन बियाणे खरेदी केले व गुरुवारी लागवडीचा मुहूर्त काढून लागवडीची संपूर्ण तयारी केली. अक्षरशः वाजंत्री पथक शेतात नेऊन वाजत गाजत बियाण्यांचे पूजन केले.
यावेळी त्यांनी शेतीच्या बांधावर पूजा केली व लागवड करणाऱ्या मजुरांचा सन्मान केला.यावेळी त्यांना पेढे भरून वाजत गाजत कापसाची लागवड केली. वाजत गाजत कापूस लागवडीचा विषय जिल्ह्यात चांगलाच चर्चेला जात आहे.