---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा

आधीच मिळत नाही शेतकऱ्याला भाव त्यात २०० क्विंटल कापूस झाला आगीत खाक !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने दोनशे क्विंटल कापूस खाक झाल्याचे घटना तीन मार्च रोजी घडली. यावेळी अंदाजे 15 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (cotton on fire chalisgaon)

cotton fire jpg webp webp

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचा कापूस या ठिकाणी होता लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग इतकी भीषण होती की अगदी काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं.

---Advertisement---

या घटनेमुळे गोडाऊन मधील तब्बल दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान म्हटले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच महूणबारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिसांसह धाव घेतली व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली


Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---