मयत होमगार्ड कुटुंबाला माणुसकीचा हात, पोलीस व होमगार्ड युनिटने दिली आर्थिक मदत
Savda News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील चिनावल येथील होमगार्ड प्रकाश भालेराव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना पोलीस व होमगार्ड युनिटतर्फे आर्थिक मुदत देण्यात आली आहे.
होमगार्ड प्रकाश भालेराव हे सावदा युनिटचे होते. त्यांच्या परीवारास सावदा पोलीस स्टेशन मार्फत ३१ हजार रुपये रोख मदत उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे फैजपूर भाग, सावदा पोलीस मार्फत चे स.पो.नी. देविदास इंगोले, पीएसआय समाधान गायकवाड तसेच सावदा पोलीस स्टेशन स्टाफ यांचे तर्फे देण्यात आली.
तर होमगार्ड युनिट तर्फे देखील या परीवारास होमगार्ड बांधवांनी पैसे जमा करून रोख रक्कम 16 हजार रुपये मदत दिली. यावेळी ही मदत सावदा होमगार्ड प्रभारी अधिकारी दिपक खाचणे, निलेश खाचणे, प्रकाश सापकर, अनील तडवी, विनोद म्हसदे व होमगार्ड बांधव उपस्थित होते.