चुंचाळेच्या शेतमजुराने उचलले टोकाचे पाऊल

सप्टेंबर 6, 2022 11:04 AM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ३५वर्षीय शेतमजुराने शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

jalgaon 43 jpg webp

सतीश शेनफडू पाटील (35) असे मयताचे नाव आहे. सतीश हा तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी साकळी शिवारातील उज्जैनसिंग राजपूत यांच्या शेत-शिवारात कामाला गेला होता. त्यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला त्याने ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला व तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.

मयत सतीश पाटील याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी योगेश कृष्णा पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सतीश पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now