भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवला
जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविला आहे.
ट्रेन क्रमांक ०९०५१ दादर ते भुसावळ त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत चालविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्या आतापर्यंत मर्यादित कालावधीसाठी चालविण्यात येत होत्या, परंतु आता या गाड्यांचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ ते दादर त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९०४९ दादर ते भुसावळ साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडू दि. २८ मार्च २५ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९०५० भुसावळ ते दादर साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी दि. २८ मार्च २५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाहीप्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.