जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । ठिबक नळ्यांच्या मालाची डीलीव्हरी केल्यानंतर आलेली रक्कम घेऊन चालक पसार झाल्या प्रकणारी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने त्या चालकास नेरी येथून अटक केली आहे. पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसुंबा, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
व्यवस्थापक चिराग शहा यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. पंकज सोनवणे हा एमआयडीसी परिसरातील ठिबक नळ्या तयार करणा-या कंपनीत चालक म्हणून कामाला होता. गेल्या वर्षी सन 2021 मधे कंपनी व्यवस्थापक चिराग शहा यांनी चालक पंकज सोनवणे यास जालना येथील तिघा व्यापा-यांकडे ठिबक नळ्या घेऊन रवाना केले होते. जालना येथील तिघा व्यापा-यांकडून जमा करण्यात आलेली एकुण रक्कम 2 लाख 81 हजार 400 रुपये त्याने कंपनीत जमा केली नाही. आपल्या ताब्यातील बोलेरो पिक अप वाहन एमआयडीसी परिसरात लावून तो पसार झाला होता.
याप्रकरणी व्यवस्थापक चिराग शहा यांनी 5 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आरोपी पंकज सोनवणे याचा शोध सुरु होता. त्याच्या शोधार्थ पुणे व गोवा येथे गुन्हे शोध पथक जावून आले होते.