⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

कार चालकाने सहाय्यक निरीक्षकाला मारली लाथ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । पोलीस अधिकारी व कर्मचारी कायदा-सुव्यवस्था बंदोबस्त व नाकाबंदी कर्तव्य करीत असताना एका वाहन चालकाने हुज्जतबाजी घालत चक्क कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर छातीत लाथ मारून शिवीगाळ केल्याचा प्रकार थर्टी फस्टच्या रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला. ( सतिष वाडे रा.तारामती नगर चोपडा ) असे वाहन चालकाचे नाव आहे. वाडे याच्या विरोधात शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून, सदर घटनेने संपूर्ण चोपडा शहर हादरले आहे.

सविस्तर वृत्त असे की , फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमेर वाघरे आपल्या स्टाफसह ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३१ डिसेंबर निमित्त व नववर्ष आगमनानिमित्त कायदा-सुव्यवस्था बंदोबस्त व नाकाबंदी कर्तव्य करीत असताना निळ्या रंगाचे फियाट कंपनीचे वाहन क्रमांक ( एमएच १४ एपी १८९१ ) वरील चालक सतीष सोमा वाडे रा. तारामती नगर चोपडा याचे वाहन थांबवून त्याचेकडे वाहनाची कागदपत्रे मागितल्याचा राग आल्याने त्याने फिर्यादी पो.कॉ.सुमेर वाघरे तसेच साक्षीदार पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमेर वाघरे यांना जाणीवपूर्वक छातीत बुक्की मारून साक्षीदार सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे यांना छातीत लाथ मारून अश्लील शिवीगाळ करत मी तुम्हा सर्वांचा बाप आहे. ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवून देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध खोटा ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करून तुम्हा सर्वांची दोन दिवसात वर्दी उतरवतो. अशी धमकी देऊन फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुमेर वाघरे व साक्षीदार सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून, वाहन चालक सतीष वाडे याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये भाग पाच गुं . र नं. ०१/२०२२ भादवि कलम ३५३, १८६, २९४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हात उचलला जात असेल तर सामान्य लोकांचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात अशीच हुज्जत एका महाशयांनी घातली होती. सदर महाशयांना पोलिसांनी खाकीचा चांगलाच दणका दिला होता. पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रमाण चोपडा शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. हा एक चिंतेचा विषय बनत आहे.

सदर घटनास्थळी कृषिकेश रावले सहा पोलीस अधीक्षक चोपडा उपविभाग चोपडा, अवतारसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चोपडा यांनी भेट दिली आहे. पुढील तपास सहा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले चोपडा उपविभाग चोपडा हे करीत आहेत.

हे देखील वाचा :