जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । तेल व्यावसायिकाच्या व्यवहाराची ४ लाख ३५ हजारांची रक्कम घेवून धरणगावातील चालकाने पोबारा केल्याची घटना शहरात सोमवारी (दि.४) घडली. या प्रकरणी एका विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
मलकापूर येथील तेल व्यावसायिक नितीन दिलीप नैनाणी यांनी भुसावळातील साई जीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल (पिंटू) कोठारी यांना तेल विक्री केले होते. त्यापोटी ४ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम आणण्याची सूचना त्यांनी त्यांचे चालक गजानन सुशीर याला केली. त्यानुसार ३० मार्चला सुशीर हा जळगाव येथे तेलाच्या बरण्या पोहोचण्यासाठी निघाला असताना भुसावळात येऊन कोठारी यांना भेटला. मालकाने सांगितल्यानुसार सायंकाळी पैस देण्यास सांगितले. यानंतर तो रात्री जळगाव येथून पिकअप व्हॅन घेऊन भुसावळात परतला. त्याला कोठारी यांच्या साईजीवन सुपर शॉपीचे व्यवस्थापक गजानन राजेश चव्हाण यांनी ४ लाख ३५ हजारांची रक्कम सोपवली. पैसे मिळाल्याबाबत सुशीरने मालक नैनाणी यांना माहिती दिली.
मात्र, त्यानंतर रात्री १०.४५ वाजता फोन बंद करून तो पसार झाला. या प्रकरणी गजानन सुशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार उमाकांत पाटील करत आहे.