भरधाव ट्रक कलंडला ; गाडीखाली सापडून चालकाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२४ । अकोला येथून माल खाली करून भुसावळकडे येणाऱ्या आयशर (क्र.एमएच.१९-सीवाद.९ ८५९) वरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी दुसऱ्या लेनवरून सर्व्हिस रोडवर कलंडली. या अपघातात गाडीखाली सापडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना साकरी येथील बंद टोलनाक्याजवळ घडली. सुनील जगन्नाथ पाटील (वय ४५ रा. श्रीराम नगर, भुसावळ) असे मृताचे नाव आहे.
मुंबई येथून माल भरून तो अकोला येथे पोहोचवला. तेथून भुसावळकडे येताना अनियंत्रित झालेली आमशर गाडी महामार्गावरील दुसऱ्या लेनवर जावून सव्र्हिस रोडवर आदळली. यात चालक सुनील जगन्नाथ पाटील (वय ४५ रा. श्रीराम नगर, भुसावळ) यांचा गाडीखाली दाबले जाऊन मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक निर्मल कोठारी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले, क्रेनच्या सहाव्याने रिकामी गाडी उचलून चालक सुनीलचा मृतदेह बाहेर काढून ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आला. तालुका पोलिस ठाण्याचे एपीआय विशाल पाटील, बाजारपेठचे उपनिरीक्षक राजू सांगळे घटनास्थळी होते. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.