⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्ह्याला मिळणार सव्वा कोटींची आधुनिक‎ जमीन मोजणीची उपकरणे‎

जिल्ह्याला मिळणार सव्वा कोटींची आधुनिक‎ जमीन मोजणीची उपकरणे‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या‎ अडचणी आणि भूमिअभिलेख‎ कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या‎ बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची‎ होणारी अडचण लक्षात घेऊन १२‎ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे‎ भूमिअभिलेख कार्यालयास‎ मिळणार आहेत. यासाठी १ कोटी‎ २० लाख ६१ हजार ३० रुपयांची‎ तरतूद केली आहे. यातून रोव्हर‎ मशीन युनिट प्रणाली यांचा समावेश‎ असल्याची माहिती पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी दिली.‎

यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे. उर्वरित ईटीएस मशीन‎ आणि प्लॉटरसाठी ७० लाखांची‎ तरतूदही पुढील काळात करण्यात‎ ‎ येणार असल्याचे पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांनी सांगितले.‎ भूमिअभिलेख कार्यालयातर्फे‎ जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या‎ अभिलेख्यांचे जतन करण्यासह‎ नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या‎ जमिनींचे मापन करण्यात येते. यात‎ हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती,‎ ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान‎ आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख‎ तयार केले जातात. आजवर या सर्व‎ प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक‎ पद्धतीत पार पाडल्या जातात.‎ यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ‎ तर लागतेच पण अनेक ठिकाणी‎ झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे‎ जमीन मोजणीत मोठ्या अडचणी‎ येतात. या अनुषंगाने जिल्हा‎ भूमिअभिलेख विभागाला जमीन‎ मोजणीसाठी अद्ययावत उपकरणे‎ मिळावीत, अशी मागणी संबंधित‎ खात्यातर्फे करण्यात आली हाेती.‎

विभागाचे‎ आधुनिकीकरण : प्रत्येक तालुक्याला एक असे १५‎ भूमिअभिलेख कार्यालये आणि एक‎ नगर भूमापन असे १६ कार्यालये‎ आहेत. या सर्व कार्यालयांच्या‎ आधुनिकीकरणासाठी या निधीचा‎ उपयोग होईल. अंतर्गत जीआयएस‎ प्रणालीचा वापर करून रोव्हर‎ मशीनच्या मदतीने भूमिअभिलेख‎ कार्यालयाचे अद्ययावतीकरण‎ करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या‎ कार्यान्वयनासाठी आवश्यक‎ असणारे जिल्ह्यात चार कॉर्स‎ स्टेशन्स असून, ते अनुक्रमे‎ शासकीय अभियांत्रिकी‎ महाविद्यालय, जळगाव, प्राथमिक‎ आरोग्य केंद्र, फत्तेपूर ता. जामनेर,‎ सार्वजनिक बांधकाम खाते‎ कार्यालय अमळनेर आणि‎ सार्वजनिक बांधकाम खाते‎ कार्यालय भडगाव येथे स्थापित‎ करण्यात आलेली आहे. याच्याशी‎ कनेक्ट असणाऱ्या १२ रोवर मशिन्स‎ या निधीतून खरेदी होतील.‎

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.