⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला अटक

लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणा-या हद्दपार सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी सुप्रिम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी सुरा जप्त करण्यात आली असून याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हद्दपार सराईत गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (२२, रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी) हा बुधवारी सायंकाळी ६.४० वाजता सुप्रिम कॉलनीतील रामदेव बाबा मंदिराजवळ हातात सुरा घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांचे पथकाने रामदेव बाबा मंदिराजवळ सापळा रचून पिण्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या कमरेला लावलेला लोखंडी सुरा जप्त करण्यात आला.

१९ गुन्हे दाखल…
दिनकर उर्फ पिण्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द मालमत्तेविरूध्द तसेच शरीराविरूध्दचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याला जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील आदींनी केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.