शनिवार, डिसेंबर 2, 2023

कापूस दर वाढीला लागला फुलस्टॉप !

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ ।  कापसाला सध्या ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विटल भाव सुरु आहे. मात्र हा भाव १०००० पर्यंत जावा अशी आस बळीराजाला आहे.अस असल तरी कापुस दर वाढीच्या विषयाला फुल्सस्टॅप लागला असल्याचे म्हटले जात आहे.

याचे कारण म्हणजे, मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांनी कापूस दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले कि, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दरवाढीसंदर्भात केंद्राकडूनच निर्णय होणार आहे.

येत्या हंगामातील हमीभाव दिलासा देणार असल्याचे सांगत दरवाढीसंदर्भात कुठलेही ठोस आश्वासन न दिल्याने कापूसकोंडी कायम राहणार आहे.तूर्तास तरी कापसाची दरवाढ होणार नसल्याचे तज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात आले.

शेतकयांना पुन्हा एकदा वाऱ्यावर
कापसाला सध्या ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विटल भाव सुरु आहे. फॅक्टरी पोहोच, जागीच खरेदी, कापसाचा दर्जा या निकषांनुसार कापसाचा दर निश्चित केला जात आहे. यंदाचा खरीप हंगाम दाराशी असताना कापूसकोंडी सुटत नसल्याने अनेकांच्या घरात आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच शासनाकडूनही ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकयांना पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले गेले आहे.