⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नगरसेवक पोकळे यांनी वॉर्डाचा विकास करावा – सुनील महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । नुकताच निवडणुक आयोगाने दिलेला निर्णय हा स्वागत करणारा आहे. आता शिवसेना नांव व धनुष्यबाण चिन्ह हे अधिकृत रित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. जळगांव महानगरपालिकेत आज रोजी असलेले महापौर, विरोधी पक्षनेता, गटनेता, तसेच इतर सदस्य हे शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हांवर निवडुन आलेले आहेत त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी ऍड. दिलीप पोकळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पुढे पत्रात लिहिले आहे कि, त्यांनी त्यांचेकडील असलेले पद सोडावीत तसेच सदस्य पदाचा देखील राजीनामा द्यावा. महानगरपलिकेतील कुठल्याच कामकाजात शिवसेना नांव व धनुष्यबाण चिन्ह वापरू नये. अशी मागणी ऍड. दिलीप पोकळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

यावर उत्तर देतांना मनपा विरोधीपक्ष नेते सुनील महाजन म्हणाले की, नगरसेवक ऍड दिलीप पोकळे यांनी प्रसिद्धच्या मागे न पाळता किंबहुना जाता त्यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.