बँक सुट्टयांमुळें पोस्टात लागली रांग
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने पेन्शन धारकांचे चांगलेच हाल झाल्याचे चित्र दिसून आले. पेन्शन जमा होऊन देखील ते बँकांच्या सुट्ट्यांमुळे काढता आले नाही. यामुळे सोमवारी पोस्टात पेन्शन धारकांची चांगलीच गर्दी उसळली होती. त्यातच सर्व्हर डाउन मुले वयोवृद्धांना तासंतास ताटकळत राहावे लागल्याने पेन्शन धारकांतून नाराजी व्यक्त केली जात होती.
शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये सोमवारी सकाळ पासुनच पेन्शन धारकांनी पेन्शनची रक्कम काढण्यासाठी व टाकण्यासाठी रांग लावली होती. मात्र येथील कॉम्पुटरचे सर्व्हर डाउन असल्याने पेन्शन धारकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली यामुळे पेन्शन धारक व कर्मचाऱ्यामध्ये काहीसे वाद देखील झाल्याची पाहावयास मिळाले मात्र सर्वर डाउनमुळे कर्मचारी देखील हतबल झाले होते. अनेक नागरिक तर रांगेतून घरी निघून गेले व काही वेळाने पुन्हा पोस्टात आले होते. मात्र तरी देखील त्याना बराच वेळ वाट पहावी लागली. यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती.