⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

१०० कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांवरून आयुक्त देणार जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १०० कोटीच्या निधीतून घेतलेल्या कामांवर अनेक उपस्थित झाले आहेत. पर्यायी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या जिल्हाधिकारी यांना अहवाल मांडणार आहेत. शहरात अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी व भूमीगत गटारीचे झालेले व बाकी कामे याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडला जाणार आहे. यात दोन्ही योजनांचे कामे ज्या रस्त्यांवर झाले त्याच रस्त्यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली जाणार आहे.

या निधीतून शहरातील २६७ रस्त्यांचे कामे प्रस्तावीत असून हे कामे सार्वजनीक बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे. या रस्त्यांचे कामांची यादी तयार करतांना महापालिकेला विश्वासात न घेता तयार झाल्याने अनेक रस्ते झालेले असून काही ठिकाणी काम सुरू असतांना असे कामे या निधीत घेतली आहे. त्यामुळे १०० कोटीच्या काम बाबात गोंधळ निर्माण झाला आहे.

आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

१०० कोटीच्या रस्ते कामांच्या यादीबाबत आयुक्त डॉ. गायकवाड या जिल्हाधिकाऱ्यांना लवरच भेटणार आहेत. यात शहरात सुरू असलेल्या कामांचा अहवाल दिला जाणार आहे. जलवाहिनी व भूमीगत गटार योजनेच्या कामांची माहिती देणार आहे.

त्यातच ९१ रस्त्यांवर भूमीगत गटारी योजना, १९२ रस्त्यांवर जलवाहिनीचे कामे पूर्ण झाली आहेत. दोन्ही योजना ज्या रस्त्यांवर पूर्ण झाल्या आहेत त्या रस्त्यांना प्राधान्याने दिले जाणार आहेत. जेथे दोन्ही कामे बाकी आहे पण निधी प्राप्त व ऑडर झाली असे रस्ते दुसऱ्या टप्यात घेणे, जेथे दोन्ही कामे झाले नाही अशा रस्त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्त देणार आहेत .