त्या घरफोडीचा झाला उलगडा ; त्रिकूट जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२३ | जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीमधील आनंद भंडारी यांच्याकडे झालेल्या घरफोडीच उलगडा झाला आहे. पोलीस यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे. करण्यात यंत्रणेला यश आले आहे. भरत सपकाळे (21), रोहित संजय लोखंडे (19) व विक्की महेंद्र कोळी (21, तिन्ही रा.समतानगर) असे अटकेतील संशयीतांची रनावे आहेत.

POLICE 4

आनंद भंडारी हे बाहेरगावी गेल्यानंतर बंद घर चोरट्यांनी फोडून लॅपटॉप, हार्डडिस्क, साउंड सिस्टीम, वायफाय डोंगल, पेनड्राईव्ह लांबवला. या प्रकरणी 11 फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पोलीस कर्मचारी सुशील चौधरी यांना करताना संशयित समतानगरातील असल्याची माहिती मिळाली.

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकार्‍यांच्या मतदतीने भरत, रोहित आणि विक्की यांना अटक करण्यात आली. संशयितांकडून लॅपटॉप, साउंड सिस्टीम आणि हार्डडिस्क जप्त करण्यात आली तर चौथ्या पसार संशयीताचा कसून शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now