Yawal : विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील साकळी या गावातील एक २४ वर्षीय तरुण बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी गेला होता. मात्र, तो नंतर घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या कब्रस्तान जवळील शेताच्या विहिरीत आढळला.
तातडीने मृतदेह त्यातून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
साकळी येथील सलीम उर्फ गोलू सायबु तडवी असे मयत तरुणाचे नाव आहे. वसंत चिंधू महाजन यांच्या शेत विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. तातडीने त्याला विहिरीतून काढण्यात आले व यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी बुधवारी शावखा बाबू तडवी यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.