⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | २२ तासांनी आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह, मित्र, कुटुंबीयांचा टाहो

२२ तासांनी आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह, मित्र, कुटुंबीयांचा टाहो

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळ राहणाऱ्या १५ ते २० वर्षीय तरुण-तरुणींचा गट काल रविवारी रोजी कांताई बंधारा, नागाई-जोगाई परिसरात आले होते. काही तरूणी फोटो काढत असताना एकीचा पाय सटकला ती खाली पडताच तिला वाचविण्यासाठी दोन ते तीन मुलांनी पाण्यात उडी घेतली. ते बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी इतरांना धाव घेतली. घटनेत चौघांना वाचविण्यात यश आले. मात्र, नयन निंबाळकर (वय-१६) हा तरुण सापडला नव्हता त्याचे आज सोमवारी रोजी तब्बल १३ तासांनंतर मृतदेह सापडला आहे.

शहरातील दुध फेडरेशन परिसरातील मिथीला अपार्टमेंटमधील काही तरूण-तरूणी गणेशोत्सव झाल्यानंतर काल रविवारी सकाळी पिकनिकसाठी आपआपल्या परिवाराची परवानगी घेवून कांताई बंधारा परिसरात आले होते. कांताई बंधाऱ्याजवळ सकाळी ११वाजेच्या सुमारास ते पोहचले. काही तरूणी फोटो काढत असताना एकीचा पाय सटकला ती खाली पडताच तिला वाचविण्यासाठी दोन ते तीन मुलांनी पाण्यात उडी घेतली. यामध्ये काही तरूणांना बाहेर येता आले तर एक तरूणाला बाहेर येता आले नाही. त्यामध्ये पाऊस सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने तरूण वाहून गेला. त्यानंतर या घटनेची परिवाराला माहिती मिळताच परिवारातील काही सदस्य घटनास्थळी दाखल होवून स्थानिक गावकऱ्यांच्या तसेच मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथक व जैन इरिगेशनच्या टिमच्या माध्यमातून तरूणास नदीत शोधण्याचे कार्य तब्बल ७ तास सुरु होते. परंतु या पथकाला रात्री 8 वाजेपर्यंत यश मिळालेले नव्हते. यावेळी पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पीएसआय नयन पाटील यांच्यासह तालुका पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, अखेर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. नयनचा मृतदेह दुपारी जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉ. रेणुका भंगाळे यांनी नयनला मयत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात यावेळी शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नयनच्या पश्चात आई, वडील, बहिण, काका, काकू, आजी असा परिवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह