⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | तरूणीला घरी बोलावून केला अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

तरूणीला घरी बोलावून केला अत्याचार ; चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यासह राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या काही थांबताना दिसत नसून यातच चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आलीय. १९ वर्षीय तरूणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जुलै २०२४ मध्ये तरूणीला गावात राहणारी पूजा शेळके हिनी घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. यावेळी रूममध्ये आधीच येवून बसलेला तरुणाने तरूणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना कुणाला सांगितला तर भाऊ व आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी हा दारू पिऊन आल्यानंतर तरूणीचा हा पकडून आंगावर ओढले. हा प्रकार तरूणीच्या आईवडीलांसमोर झाला. दरम्यान पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.