---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Kajgaon : शेतातील विहीरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

new project (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । भडगाव तालुक्यातील कजगाव ते भडगाव महामार्गावरील कजगाव शिवारातील शेतातील विहिरीत आज सकाळी अंदाजे २५ ते ३० वर्ष वय असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

new project (1)

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कजगाव ते भडगाव महा मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने या बाबत कजगाव चे पोलीस पाटील राहुल पाटील यांना कळविल्या वरून भडगांव पो.स्टे ला खबर दिल्याने घटनास्थळी पोलिस उपनिरिक्षक सुशिल सोनवणे,पोलिस नाईक नरेंद्र विसपुते, व इतर पोलिस कर्मचारी यांनी धाव घेत घटना स्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे
सदर मृत महिलेच्या डाव्या हाताच्या अंगठ्या वर मागील बाजूस इंग्रजीत पी असे गोंदलेले आहे

---Advertisement---

सदर घटने बाबत कजगांव पोलिस पाटील राहुल पाटील यांच्या खबरीवरून भडगांव पोलिसात अक्समात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---