जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेतील शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष निधी दिला होता. या निधी अंतर्गत जळगाव शहरातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लागणार होती. मात्र नगरसेवक चेतन सनकत यांच्या प्रभागातील रस्त्यांची कामे महानगरपालिका प्रशासन करत नसल्याचे सनकत यांनी सांगितले व येत्या १५ दिवसात हे काम पूर्ण झाले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. अशावेळी महानगरपालिकेतील सर्वच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकास करायचा आहे अशात जळगाव शहर महानगरपालिकेचे शिंदे गटाचे नगरसेवक चेतन सनकत यांना महानगरपालिका प्रशासन सहाय्यक करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि सुनिल चौधरी यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील रस्ते व्हावेत यासाठी पाठपुरावा करून विशेष निधी आणला. मात्र प्रशासन व संबंधित ठेकेदार मिलीभगत करून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यास दिरंगाई करत आहेत अशावेळी संबंधित ठेकेदारास प्रशासनाने कार्यादेश न दिल्यास आणि मुदतीच्या आत दर्जेदार काम करून न घेतल्यास प्रशासनाची तक्रार थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे नगरसेवक चेतन सनकत यांनी जळगाव लाईव्ह बोलताना सांगितले.