जळगाव शहर

जळगाव येथील फुले मार्केटमधील कपड्याच्या दुकानाला आग

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरातील मध्यवर्ती असलेले फुले मार्केट मधील एका रेडिमेट कपड्याच्या दुकानाला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळे मार्केट परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. या आगीच्या घटनेमध्ये दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

GMfire 1

जळगाव शहरातील फुले मार्केट मधील पूजा कलेक्शन नावाच्या एका रेडिमेट कपड्याच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना माहिती पडताच महापालिकेचे अग्निशामन दलाचे पथक या ठिकाणी तात्काळ दाखल होऊन आगी वरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र या आगीच्या घटनेमध्ये दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी नाही

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button