औरंगाबादमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपुढे ठाकरेंची शिवसेना फेल
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायती पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. यामुळे कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये शिवसेनेला चांगलाच दणका बसला आहे. कारण १५ पैकी १२ जागांवर शिंदे गटाला मिळाले असून केवळ एका ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाला यश मिळालं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती पैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालय.
औंगाबाद
1 : वडगाव कोल्हाटी 17 जागा शिंदे गट
11 जागेवर(संजय सीटसाठ, शिंदे गट )
4 शिवसेना
2 भाजप
सिल्लोड
1 उपळी सत्तार(शिंदे गट )
2 नानेगाव सत्तार(शिंदे गट )
3 जांभळा सत्तार(शिंदे गट )
गंगापूर
1अगरकानडगव- भाजप
2 ममदापूर – शिवसेना ठाकरे गट
वैजापूर
1 पणवी खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट
2 लाख खंडाळा रमेश बोरणारे शिंदे गट
पैठण
1 खादगाव राष्ट्रवादी
2 खेरडा भुमरे शिंदे गट
3 नानेगाव भुमरे शिंदे गट
4 आपेगाव भुमरे शिंदे गट
5 अगर नांदूर भूमरे सशिंदे गट
6 शेवता भुमरे शिंदे गट
7 तांडा बूदृक भुमरे शिंदे गट