⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | भीषण अपघात ! ट्रकला व्हॅगनारची धडक : एक ठार, दोन गंभीर

भीषण अपघात ! ट्रकला व्हॅगनारची धडक : एक ठार, दोन गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । जळगावकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर दुपारपासून थांबलेल्या ट्रकला मागून व्हॅगनार मारुती कार ने धडक दिली. त्यात चंद्रकांत नामदेव पाटील वय ४५ वर्ष राहणार नगाव (धुळे) हे जागीच ठार झाले. त्यांचे साथीदार अशोक तोरवणे वय ४८ वर्ष, व सतीश हेमचंद्र चौधरी वय ४७ गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी ६ जून २०२२ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीजी ०४ जेडी ०२८२ क्रमांकाचा ट्रक दुपारपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद धाब्यावर थांबला होता. या उभ्या ट्रकला एम एच २० सी एस १३८४ क्रमांकाच्या मारुती कारणे जोरदार धडक दिली त्यात कार मधील चंद्रकांत नामदेव पाटील हे जागीच गतप्राण झाले तर अशोक तोरवणे व सतीश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यावेळी माजी जि.प. सदस्य नाना भाऊ महाजन, रवींद्र चौधरी प्रमोद महाजन हे पिंपरी प्रचा येथे लग्नाला हजेरी लावून एरंडोल कडे परत येत असताना त्यांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस स्टेशनला व ग्रामीण रुग्णालयाला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व घटनेची माहिती दिली. पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी नाना भाऊ महाजन व त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांनी मदत कार्य केले. खाजगी गाडीने अपघातातील ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दोघा गंभीर जखमी व्यक्तींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी गंभीर जखमींवर प्रथमोपचार . करून ॲम्बुलन्स त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आले. या अपघातात चालका जवळ पुढे बसलेला इसम जागीच ठार झाला.

कार मधील तिघे जण जळगाव येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाला हजेरी लावल्यानंतर ते धुळ्याकडे घरी परत जात. एरंडोल नजीक क्रूर काळाने अपघाताच्या निमित्ताने त्यांच्यावर झडप घातली. हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील पंकज पाटील, राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह