भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत ३ तरुण जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुण जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे.याच बरोबर एक जण गंभीर जखमी झाला आहे. संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री हि घटना घडली आहे.सुमारे साडेआठच्या वेळेस हि घटना घडली.या घटनेत ३ जणांचा जीव गेला असून १ जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवरवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

ऋषीकेश हासे ( वय वर्षे 20 ), सुयोग हासे ( वय वर्षे 20 ), निलेश सिनारे ( वय वर्षे 26 ) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.