जळगाव जिल्हा

प्रवाशांनो लक्ष द्या : ‘या’ विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदत वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । आगामी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता मुंबई-हटिया, पुणे-संत्रागाची, साईनगर शिर्डी-हावडा या तीन विशेष सुपरफास्ट  गाड्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. या विस्तारित कालावधीतील गाड्यादेखील विद्यमान रचना, वेळ आणि मार्ग इत्यादींवरच चालतील. प्रवाशांनी या गाड्यांच्या विस्तारित कालावधीची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ०२८११ एलटीटी-हटिया या द्वि-साप्ताहिक विशेषचा कालावधी ३ ऑक्टोबर ते २ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवला आहे. तर गाडी क्रमांक ०२८१२ हटिया-एलटीटी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०२८१८ पुणे-संतरागाची साप्ताहिक विशेष या गाडीचा कालावधी ४ ऑक्टोबर ते २७ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

तर गाडी क्रमांक ०२८१७ संत्रागाची-पुणे साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २ ऑक्टोबर ते २५ डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०२५९३ साईनगर शिर्डी-हावडा साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी ९ ऑक्टोबर २०२१ ते १ जानेवारी २०२२पर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. तर गाडी क्रमांक ०२५९४ हावडा-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी ७ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर वाढवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button