जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात थंडीची तीव्रता दिसून आली. दोन दिवसापूर्वी जळगावात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आजपासून जिल्ह्यात तीन दिवस उन्हाचा चटका वाढणार असून, शुक्रवारी तापमान अचानक कमी हाेण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात माेठी घसरण हाेऊन ‘काेल्ड डे’ची स्थिती निर्माण शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.

रविवारी जळगाव शहर परिसरात तब्बल ११ वर्षांनंतर सर्वात नीचांकी ५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात हे सर्वात कमी तापमान ठरले. तर रविवारी दुपारचे तापमान ३३ अंशांपर्यंत वाढले हाेते. कमाल आणि किमान तापमानात २८ अंश सेल्सिअसचे अंतर असल्याने रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका अशी स्थिती हाेती.

दरम्यान, सध्या असलेली थंडीची लाट आजपासून कमी होणार असून आजपासून जिल्ह्यात तीन दिवस उन्हाचा चटका वाढणार आहे. पुढील तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा वातावरणात गारवा येणार असून, थंडीची लाट पुन्हा परतण्याची शक्यता वाढली आहे. थंडीची लाट काहीसी ओससरत असताना येत्या ४ फेब्रुवारी राेजी तापमानात अचानक घट हाेण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या दिवशी वातावरण ढगाळ राहील.
यंदाच्या हिवाळ्यात काेल्ड वेवपेक्षाही (थंडीची लाट) ‘काेल्ड डे’ (थंड दिवस) ची वारंवारता अधिक आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दाेन महिन्यांत जळगावकरांनी चार वेळा ‘काेल्ड डे’ अनुभवला असून, येत्या ४ फेब्रुवारी राेजी पुन्हा तापमानात घसरण हाेऊन दिवसभर गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. .
काय आहे ‘काेल्ड डे’
रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलेले असताना दिवसाचे कमाल तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा अचानक ४.५ अंश सेल्सिअसने कमी हाेऊ शकते. अशा स्थितीत रात्रीसाेबतच दिवसाही गारठा जाणवताे. त्याला ‘काेल्ड डे’ असे म्हटले जाते.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !







