जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून यामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. रात्री झोप नाही आणि दुपारी बाहेर पडायची उष्णतेमुळे सोय नाही अशी अवस्था झाली आहे. घामाच्या धारा आणि नको जीव झाला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी लोक आता मान्सून पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा करीत आहे.
दरम्यान, जळगावमधील तापमानाचा पारा सध्या ४२ ते ४३ अंशांच्या टप्प्यात आहे. तरीही उकाडा असह्य झाला आहे. बुधवारी कमाल तापमान ४२ अंशावर होते तर किमान तापमान २७ अंश होते. आज देखील कमाल तापमान ४२ ते ४३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस असेच तापमान राहील असा अंदाज आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे मात्र जळगावकर चांगेल हैराण झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळं तापमान गाठलं होतं. मात्र, आता मे महिन्यात सूर्य आग ओकतोय.
दुपारनंतर तर सूर्यनारायण आग ओकत आहे. यामुळे दुपारीनंतर तर बाहेत पडणे कठीण झालं आहे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे शहरातील वर्दळ मंदावलेली दिसून येते तर दुपारी बाजारपेठेत अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती असते.