⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोसमी वारे वाहत असल्याने उकाडा झाला कमी; वाचा आजचे तापमान कसे असेल

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असलयाने उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. जळगावात अद्यापही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या नसल्या तरी मोसमी वारे वाहत असलयाने दिवसासह रात्रीच्या वेळेस उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातला तापमानाचा पारा काहीसा घटलेला दिसून आला. आज रविवारी सकाळ ११ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ३६ अंशावर होता. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे.

यंदा मान्सून वेळेआधी लवकरच अंदमानात दाखल झाला असून मान्सूनचा प्रभाव राज्यावर जाणवत आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही तापमानाचा पारा वाढताच आहे. जिल्ह्यात मे महिन्यात ढगाळ स्थिती असूनही तापमान ४५ अंशांपर्यंत वाढल्याची स्थिती हाेती; परंतु गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात प्रथमच ढगाळ वातावरणात तापमान ४१ अंश सेल्सिअस खाली आले आहे.

सध्या मोसमी वारे वाहत आहे. यामुळे हवा थंड असल्याने या वाऱ्याने तापमानाची तीव्रता कमी केली. शनिवारी दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान दुपारी २ वाजेपर्यंत ३८ अंशांपर्यंत हाेते. त्यानंतर त्यात वाढ झाली. ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता २२ टक्क्यापर्यंत वाढलेली हाेती. रात्रीचे किमान तापमानही ३० अंशांवरून कमी हाेऊन २७ अंशांपर्यंत खाली आले हाेते. तर कमाल तापमान ४२.४ अंशांवरून ४०.८ अंशांवर खाली आले हाेते

आज रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ३८ अंश इतका आहे. तर दुपारी ४ वाजेपर्यंत ४० अंशावर जाऊन स्थिरावणार आहे. साहजिकच यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३६ अंश
१२ वाजेला – ३८ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ४० अंश
३ वाजेला – ४० अंशापुढे
४ वाजेला – ३९ अंश
५ वाजेला – ३८ अंश
६ वाजेला – ३७ अंश
७ वाजेला – ३४ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३३ तर रात्री ९ वाजेला ३२ अंशावर स्थिरावणार.