---Advertisement---
हवामान

जळगावात पावसाच्या सरी ; तापमान ४० अंशाखाली, वाचा आजचे तापमान कसे असेल?

tapman
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । राज्यात मान्सून दाखल झाला.त्यापूर्वी त्यामुळे राज्यातील बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे गेल्या महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील जनेतला उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. जळगावचा पारा देखील चाळीशीखाली आला आहे. जिल्ह्यात गेल्या मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे ४३ पर्यंत गेलेले तापमान आता ४० अंशाच्या खाली आले. शनिवारी तापमानाचा पारा ३९.८ इतका होता. आज रविवारी तापमान ३६ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.

tapman

गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानाचा पारा ४० वर आला आहे. परंतु गेल्या आठ्वड्यात तापमानात वाढ होऊन उष्णता जाणवत होती. मात्र तीन ते चार दिवसापासून जिल्हयात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीवर आला आहे.

---Advertisement---

मान्सून देखील महाराष्ट्रात दाखल झाला असून अनेक भागात मान्सूनच्या सरी कोसळत आहे. काल राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काल दुपारनंतर पावसाचे ढग दाटून आले होते. जळगाव शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
९ वाजेला –२९ अंश
१० वाजेला – ३० अंश
११ वाजेला –३१ अंश
१२ वाजेला – ३२ अंश
१ वाजेला- ३३ अंशापुढे
२ वाजेला – ३३ अंश
३ वाजेला – ३२ अंशापुढे
४ वाजेला – ३२ अंश
५ वाजेला – ३२ अंश
६ वाजेला – ३१ अंश
७ वाजेला – ३० अंश
आणि रात्री ८ वाजेला २९ तर रात्री ९ वाजेला २८ अंशावर स्थिरावणार.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---