जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । जळगावमध्ये गेल्या काही दिवसापासून तापमानाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्याने जळगावकरांना असह्य उकाडा व उन्हाच्या दाहकतेचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी मात्र जळगाव शहरासह काही तालुक्यांमध्ये १५ ते २० किमी वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे जास्त तापमान असूनही काही प्रमाणात उन्हाची दाहकता कमी जाणवत होती. त्यात तापमानातही घट होऊन पारा ४१ अंशांवर आला होता.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही ८ एप्रिल रोजी ४३.८ अंश इतकी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून तापमानात घट होत आहे.
मंगळवार व बुधवारी ४३ अंशांवर असलेला पारा गुरुवारी ४२ अंशांवर, तर शुक्रवारी ४१ अंशांवर आला होता.
एकीकडे दिवसाच्या तापमानात वाढ होत असताना, रात्रीच्या तापमानात मात्र ३ अंशांची वाढ झाली होती. बुधवारपर्यंत २२ अंशांवर असलेला रात्रीचा पारा शुक्रवारी २५ अंशांवर पोहोचला होता
आगामी पाच दिवस, कसे राहणार वातावरण?
१२ एप्रिल : ४० अंश….. सकाळच्या वेळेस काही प्रमाणात ढगाळ वातावरण
१३ एप्रिल : ३९ अंश….. कोरडे हवामान, जोरदार वारे वाहण्याची शक्यता
१४ एप्रिल : ४० अंश….. कोरडे वातावरण
१५ एप्रिल : ४१ अंश….. कोरडे वातावरण
१६ एप्रिल : ४१ अंश….. कोरडे वातावरण राहण्याची शक्यता