---Advertisement---
रावेर

सावदा शहरात तहसीलदारांकडून मेडिकल दुकानांची तपासणी

sawada news
---Advertisement---

 जळगाव जिल्ह्यात सध्या वाढते कोरोना रुग्ण असून त्यांचेवर उपचारा साठी रेमडीसीवीर हे उपयुक्त असून या औषधांचा साठा कमी असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करीत जिल्हाभरात मेडिकल तपासणी करून कोणत्या ठिकाणी किती साठा यांची माहिती व रेकॉर्ड तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

sawada news

यानंतर रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सावदा शहरात काही ठिकाणी मेडिकलवर तपासणी मोहीम राबविली व सदर औषधांचा साठा येथे उपलब्ध आहे का याची माहिती घेतली यावेळी मंडळ अधिकारी तसेच तलाठी पाटील आदी उपस्थित होते,. दरम्यान शहरात कोठेही या औषधाचा साठा नसून रेमीडेसीवीर तसेच कोणतेही इतर औषधाची साठेबाजी वा जादा दराने विक्री होत नसल्याचे समजते

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---