बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

सुकळी विद्यालयात स्वयंशासन : चिमुकल्यांनी केले अध्यापन

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वयंशासन कार्यक्रमांतर्गत अध्यापनाचा अनुभव घेतला आणि मोठ्या उत्साहाने शिक्षक दिन साजरा केला.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात दरवर्षाप्रमाणे शिक्षक दिनी विद्यालयाचं संपूर्ण प्रशासन कामकाज विद्यार्थ्यांनी पाहिलं इतकेच नव्हे तर चिमुकल्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला आणि सांगितला.आज मुख्याध्यापक म्हणून दहावीचा विद्यार्थी उमेश कुंभार तर उपमुख्याध्यापिका म्हणून दहावीची विद्यार्थिनी कु.अंकिता इंगळे यांनी कामकाज पाहिले याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. गायत्री महाले तसेच कु. मोनिका अवचारे , कु.अंकिता इंगळे यांनी अनुभव सांगून मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, उपशिक्षक डी.एम.फेगडे, शरद बोदडे , शरद चौधरी श्रीमती वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे, लिपिक नवल कोळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिल चौधरी, जया सोनवणे आदी उपस्थित होते.