तलाठी पदांसाठी मेगाभरती जाहीर ; जळगाव जिल्ह्यात किती जागा रिक्त? वाचा..
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच तलाठी पदांसाठी भरती होणार आहे. एकूण ४ हजार १२२ तलाठी MPSC मार्फत भरली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती शासनास पाठविण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातारवण आहे. Talathi Bharti 2023
एकूण रिक्त पदांपैकी जळगाव जिल्ह्यात एकूण 198 जागा भरण्यात येण्याची शक्यता आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
Talathi Bharti : कोणत्या विभागात किती पदे भरणार?
नाशिक – १०३५
औरंगाबाद – ८७४
कोकण – ७३१
नागपूर – ५८०
अमरावती – १८३
पुणे – ७४६