राजकारणराष्ट्रीय

Breaking : अखेर काँग्रेसला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष ; यांची लागणार वर्णी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. रिपोर्टनुसार आतापर्यंत खर्गे यांना 7897 मते मिळाली आहेत आणि शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली आहेत.

congress jpg webp

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9497 मतदान झाले. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी जवळपास 96 टक्के  मतदान झालं. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील नव्हता. गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यापूर्वी सीताराम केसरी असे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते.

काँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. खरगे यांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा करत आहेत. खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या शशी थरूर यांनीही त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. थरूर यांनी ट्विट केले की, “ही खूप सन्मानाची आणि मोठी जबाबदारीची बाब आहे. मी खर्गे जी यांना त्यांच्या कार्यात यश मिळो अशी शुभेच्छा देतो.” याशिवाय काँग्रेस नेत्यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही खरगे यांनी आभार मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button