शाळकरी मुलीचा फोटो काढून विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

मार्च 30, 2022 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशात यावल तालुक्यात शाळेत शाळकरी मुलीचा फोटो काढून दोन जणांनी विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 7 jpg webp

काय आहे घटना :

यावल तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी ही गावातील शाळेच्या पायरीवर बसलेली असतांना गावातील दोन अल्पवयीन विद्यार्थी आले. यापैकी एकाने हात पकडला आणि दुसऱ्याने फोटो काढला. त्यानंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.

आपल्यावर झालेला अतिप्रसंग अल्पवयीन मुलीने पालकांना कथन केला. पिडीत मुलीसह कुटुंबियांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून दोन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now