⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | राजकारण | राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा : राष्ट्रवादी

राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा : राष्ट्रवादी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील आयोजित सभेत नागरिकांच्या भावना दुखावेल असे वक्तव्य केले असून याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना देण्यात आले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहिर सभा १मे रोजी संपन्न झाली. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने आम्ही न्युज चॅनेल वर हि संपुर्ण सभा पाहिली व ऐकली. सदर सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर, दोन समाजात तेढ निर्माण करणारे व समाज विध्वंसक होऊन राज्यभरात अशांतता निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य करत असामाजिक कृत्य केलेले आहे . तसेच त्यांनी महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवुन जनतेची दिशाभूल केलेली आहे. यामुळे सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्यांच्यावर भारतीय संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटिल, सुनील माळी, राजू मोरे, सुशील शिंदे, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटिक, किरण राजपूत, रमेश बाहरे, अकिल पटेल, राहुल टोके, नईम खाटिक, जितू बागरे, ईब्राहीम तडवी, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह