गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात घरफोडीचे सत्र थांबेना ! तरुणांचे बंद घर फोडून ५७ हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरात घरफोडीच्या घटना सुरूच असून अशातच शहरातील सागर नगरात तरुणाचे बंद घर फोडून घरातून ५७ हजार २४७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

सागर नगरातील पाण्याच्या टाकीजवळ देवीदास अनिलकुमार पैठणे (वय ३२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश् करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ५७ हजार २४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेले.

याप्रकरणी मंगळवारी शनिपेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल् करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.

दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button