---Advertisement---
बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढानंतर ‘हा’ अभिनेता करणार शोला अलविदा? कोण आहे जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । मागील गेल्या १४ वर्षांपासून लोकांच्या मनात राज्य करणारी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजकाल अनेक बदलांमधून जात आहे. या शोमध्ये एकीकडे कलाकार शो सोडत आहेत. तर, काही कलाकारांची नव्याने एन्ट्री होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी शैलेश लोढा यांनी शोला अलविदा केला. त्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या कलाकाराने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

tarak mehta show 1

राज अनडकट या शोला अलविदा करणार
राज अनडकट देखील तारक मेहता का उल्टा चष्माला अलविदा करणार असल्याचे वृत्त आहे. राज अनडकट या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारत असून तो बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही एपिसोडमध्ये दिसत नाही. अशा परिस्थितीत राज अनडकटनेही शो सोडला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे माहीत नाही, पण लवकरच त्याबाबतही परिस्थिती स्पष्ट होईल.

---Advertisement---

या कलाकारांनीही शो सोडला
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. सोढीची भूमिका करणारा गुरचरण सिंग असो, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदौरिया असो किंवा शोमध्ये अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता असो. याशिवाय सोनूच्या कॅरेक्टरमध्ये 2 चेहरे बदलण्यात आले आहेत, तर भव्य गांधी टप्पूच्या भूमिकेत राहिल्या, पण नंतर राज अनडकटने ही व्यक्तिरेखा त्याच्या जागी पुढे नेली.

दयाबेन पुन्हा शोमध्ये आली आहे का?
त्याचवेळी, या सर्व कलाकारांनी शो सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, दयाबेनला शोमध्ये परत आणले जात असल्याची बातमी येत आहे. शोचे नवे प्रोमो देखील असेच आले पण दयाबाने खरच एंट्री करणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---