जळगाव शहर

उमाळा व एमआयडीसी परिसरातील गरजू कुटुंबीयांची दिवाळी केली ‘गोड’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा व एमआयडीसी परिसरातील गरजू कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू आणत त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या सहकार्याने दरवर्षी दिवाळी निमित्त कपडे व फराळ वाटप करण्यात येते.

आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाच्या भावनेतून व यंदाच्या दिवाळीत या मुलांना चांगले कपडे मिळावे आणि ही दिवाळी मुलांना आनंदात साजरा करता यावी म्हणून जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट परिवाराच्या सहकार्याने गरजू कुटुंबीयांना कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी नवीन कपडे व फराळ भेटल्यावर या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. या सामाजिक कार्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईटचे प्रेसिडेंट यश लड्डा व सचिव लोकेश पारेख यासह संभव मेहता, हर्षदा मोगरे, हर्षाली पाटील, दिव्यांका सोनवणे, प्राजक्ता पाटील, राधिका दायमा, सुशील पाटील, अतुल पाटील तसेच महाविद्यालयातील प्रा. श्रिया कोगटा व प्रा. भाग्यश्री कोलते यांनी विशेष योगदान दिले. तसेच या सामाजिक कार्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button