⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगावात गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप

धरणगावात गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । धरणगावातील हनुमान नगर परिसरात आज सकाळी विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घातपात झाल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, मयत विवाहिता ही 6 महिन्यांची गर्भवती होती.

कोमल संजय महाजन (वय 23) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शहरातील हनुमान नगरमध्ये आज सकाळी कोमल महाजन या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे तर तिचा घातपात झाल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत कोमल 6 महिन्यांची गर्भवती होती. मागील दोन वर्षांपूर्वी तिने पती निलेश सोबत प्रेमविवाह केलेला होता.

दरम्यान मयत कोमलच्या मृतदेहाची इनकॅमेरा चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी रावले, सपोनि जीभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेका विनोद संदानशिव, विजय धनगर यांच्यासह इतर कर्मचारी हजर होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह