⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अत्याचार प्रकरणातील संशयित गजाआड

अत्याचार प्रकरणातील संशयित गजाआड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । पाचोरा‎ अत्याचार प्रकरणातील पसार असलेल्या संशयिताला अखेर महिनाभराने अटक करण्यात आले. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस‎ स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.‎ अभिमान ऊर्फ आबा अंबादास‎ वाघमारे (कोळी) (वय २६, रा.‎ घोसला, ता. सोयगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

संशयित‎ अभिमान ऊर्फ आबा अंबादास‎ वाघमारे (कोळी) (वय २६, रा.‎ घोसला, ता. सोयगाव) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार‎ झाला होता. त्यामुळे पोलिसांसमोर‎ संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान‎ होते. संशयिताच्या अटकेसाठी ‎सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र ‎वाघमारे व पोलिस उपनिरीक्षक‎ अमोल पवार यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक‎ गोकूळ सोनवणे, कॉन्स्टेबल जितेंद्र ‎पाटील यांनी शोध घेतला. गुप्त ‎माहितीवरून संशयिताला‎ पोलिसांच्या पथकाने १६ जुलैला‎ ताब्यात घेत, पिंपळगाव हरेश्वर‎ पोलिस ठाण्यात हजर केले.

गुन्हा ‎ ‎घडल्यानंतर महिनाभराचा‎ कालावधी उलटल्यानंतर पोलिसांनी‎ संशयिताच्या मुसक्या आवळल्या.‎ पुढील तपास सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पोलिस‎ उपनिरीक्षक अमोल पवार हे करत‎ ‎आहेत. संशयिताकडून गुन्ह्याची‎ सखोल माहिती पोलिस अधिकारी‎ घेत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह