जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील ३६ वर्षीय कामगाराने विषारी द्रव प्राशन करुन एमआयडीसीतील कंपनीतच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकी आलीय. संजय बंडू शेवाळे (वय ३६, मूळ रा. शिरपुर, ह. मु मेहरूण परिसर जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मयताच्या कुटूंबीयाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे
नेमकी काय आहे घटना?
संजय बंडू शेवाळे गेल्या दहा- बारा वर्षांपासुन कामधंद्यासाठी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. संजय हा एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवार (ता.३०) सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला.
कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने एमआयडीसी पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.
कुटूंबीयाला घातपाताचा संशय
दरम्यान, मयत संजयचा मृतदेह पोलिसांनी कंपनीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. संजयने गळफास घेतलेली जागा आणि त्याचे कपडे पाहिल्यावर त्याने आगोदर विषारी द्रव घेतल्याचे आढळून आले. विष घेतल्यानंतर कसा गळफास घेईल? अशी शंका कुटूंबीय आणि परिचितांनी व्यक्त केली. यामुळे आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.