---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

बनावट नोटा प्रकरणी संशयितास घेतलं कारागृहातून ताब्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगताना चेतन सावकारे या यावलच्या तरुणाला अटक केल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी आतापर्यंत पाच सशयितांना अटक केली आहे. यात यावल येथील दोन, जामनेरच्या दोघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता पुढील साखळी शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सराईत गुन्हेगार असलेला मोहंमद हकीम आमीन हा खंडवा येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे.

crime 2 jpg webp webp

मोहंमद हकीमया एक साथीदार जावेद हा अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, आमीनकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी त्याची पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे. आमीन हा बनावट नोटांचा हॅण्डलर, सप्लायर आहे? या नोटा कुठे छापल्या जात आहेत? याची माहिती त्याच्याकडे आहे या प्रश्नांची उत्तरे पोलिस मिळवत आहेत. जावेद याचाही तपास पोलिस करत आहे. आमीन याला २५ रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सपोनि मीरा देशमुख तपास करीत आहेत

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---