⁠ 
शनिवार, मे 18, 2024

पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । रावेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी  भागातील कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पाल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी बिन टाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी पाल ग्रारुचे वै अ बी बी बारेला,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील, डॉ सचिन पाटील  डॉ विजया झोपे(खिरोदा),  डॉ  नीरज पाटील (लोहारा ),  डॉ चंदन पाटील (निंभोरा), डॉ  मोरे (थोरगव्हाण) अनुपम अंजलसोंडे (वाघोड), डॉ  योगेश उंबरकर (लोहारा), मुख्य अधिपरिचरिका सौ कल्पना नगरे, यांच्यासह समन्वयक रामभाऊ पाटील, महेमूद तडवी यांच्यासह सर्व परिचारिका, कक्षसेवक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी पाल ग्रामीण  रुग्णालयाला एक आयडियल रुग्णालय सर्वांनी मिळून बनवू या असे आवाहन करीत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करवून देवू असेही नागरिक व पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले. यावेळी जळगाव येथील पवन जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.